नाशिक : पोलीस भरतीदरम्यान नाशिकमध्ये एक अजब प्रकार घडलाय. त्रंबकेश्वरमधल्या राहुल किसन पाटील या उमेदवारानं उंची वाढवण्यासाठी विग लावल्याचं उघड झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीला राहुलची निवड करण्यात आली होती, पण त्याचे केस बघुन भरतीच्या ठिकाणी असलेल्या एका हवालदाराला संशय आला. यामुळे राहुलचं बिंग फुटलं. मग राहुलची निवड रद्द करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर आता राहुल पाटीलवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधिका-यांनी सांगितलंय.