नाशिक : नाशिकमध्ये आपल्या मुलांना संपवून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका पित्यानं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये वडिलांनी दोन मुलांची गळा दाबून हत्या केलीय. तसंच मुलीलाही विष पाजून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलांची हत्या केल्यानंतर निवृत्ती बेलदार यानं रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. 


यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच मुलीवरही उपचार करण्यात येत आहेत.


नाशिकमधल्या उपनगर परिसरातील जगताप मळा इथं ही धक्कादायक घटना घडलीय. बेलदार यानं हे कृत्य का केलं? याबद्दल अधिक चौकशी सुरू आहे.