रत्नागिरी : तुम्ही आमीर खानचा दंगल सिनेमा पाहिला असेल...पण आम्ही तुम्हाला एक अनोखी दंगलच सांगत आहोत पण ती आहे रोबोटची. कुठे रंगला हा आखाडा ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळील आंबव माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी आगळीवेगळी दंगल सुरू आहे. या मैदानात व्यक्तींऐवजी रोबो कुस्तीचा आखाडा मारताना दिसत आहेत. 25 किलो वजनी गटाचे रोबोट तयार करुन त्यांचे कुस्ती सामने खेळवण्यात येत आहेत.



कुणी डिफेन्स करतंय तर कुणी ताकद लावून प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न करतोय. जो मैदानाबाहेर फेकला जातो त्याचा पराजय होतोय.


रोबोटच्या दंगलीसाठी राज्यभरातून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या मुलांनी रोबोट तयार करुन आणले होते... डाँ ड्यूड, मेगाट्रोन, आराडी 05 आणि डेविल असे रोबोट मैदानात होते. कुस्तीत जसे नियम असतात तसेच याही स्पर्धेसाठी होते.



अभ्यासातील गोडी वाढावी म्हणून हा आगळावेगळा प्रयोग राबवण्यात आल्याचं माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयोजक प्राध्यापक प्रा. निमेश ढोले सांगतात.