नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल
2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या मेट्रोच्या कामाला गती मिळत असल्याचे संकेत मिळत आहे. तळोजा एमआयडीसीतल्या कारशेडमध्ये मेट्रोचा पहिला रेक दाखल झाला आहे.
2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे.
या बेलापूर ते पेंधरचा पहिला टप्पा येत्या काही महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पण सध्या तरी 2018च्या आधी हे काम पूर्ण होईल असं चित्र नाही. नवी मुंबईकरांना २०१८ आणि २०१९ पर्यंत मेट्रोची सफर करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.