नवी मुंबई : एमजीएम शाळेमधल्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. तसंच शाळा व्यवस्थापनानेही मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी आज पालकांनी शाळेवर मोर्चा काढला होता. शाळेतील शिक्षक शिवशंकर शुक्लावर कठोर कारवाईची मागणी यावेळी पालकांनी केली. शाळा प्रशासन आणि शिक्षकाविरोधात पालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाकडून कारवाई केली जात नव्हती त्यामुऴेच ही वेळ आल्याचं यावेळी पालकांनी म्हटलंय.  दरम्यान, नेरूळ एम जी एम हायस्कुल मधील विद्यार्थीनी लेंगीक शोषण प्रकरणी तपास करणारे नेरूळ पोलीस ठाण्याचे ए पी आय वासुदेव मोरे यांच्याकडून तपास काढून क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडे देण्यात आला आहे.


 तर वासुदेव मोरे यांची चौकशी क्राईम ब्रँच करणार आहे. त्याच प्रमाणे फरार शिक्षकाला अटक करण्यासाठी स्पेशल टीम उत्तरप्रदेशात पाठवण्यात आलीय. त्याचप्रमाणे उद्या शिवसेना शाळेवर मोर्चा काढणार असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.