अमरावती : भाजपाची वाढती लोकप्रियता पाहता भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजप पक्षात प्रवेश मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांची चढाओढ लागलीय. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्या-या नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


आपण भाजप पक्षात काम करावं अशी इच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.