राष्ट्रवादीची राज्यभरात काँग्रेस बरोबर आघाडी
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली.
नांदेड : राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली.
मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांआधी स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर आलेत. निवडणुकीआधी बेटकुळ्या फुगवून स्वतंत्रपणे लढणारे आता सत्तेसाठी युती आणि आघाडीची गणितं मांडू लागलेत. तर सत्तेचा हा खेळ रंगायला सुरु झाला आहे.