पिंपरी-चिंचव़ड : अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने ४९ जागांवर विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादी आतापर्यंत २८ जागांवर विजयी झालीये. 


राष्ट्रवादीचे माजी महापौर आर एस कुमार सहावेळा निवडणुकीत जिंकले होते. मात्र सातव्यांदा त्यांना पराभव सहन करावा लागला. चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 15 मधून कुमार यांनी निवडणूक लढवली होती. 


गेली 30 वर्षे आर एस कुमार निगडी प्राधिकरण या पिंपरी चिंचवडमधल्या प्रभागातून निवडणूक लढवत होते. मात्र अखेर सातव्या वेळी त्यांना पराभवाचा धक्का बसलाय.