बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी विरोधी बाकावर, मोठी कसरत?
पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता जाण्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. मात्र पराभवानंतर आता पक्षसंघटना मजबूत करण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्याचसोबत विरोधी पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीला भूमिका पार पाडावी लागणार आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता जाण्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. मात्र पराभवानंतर आता पक्षसंघटना मजबूत करण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्याचसोबत विरोधी पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीला भूमिका पार पाडावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून कायमच सत्ते राहीलेल्या स्थानिक नेत्यांना विरोधी पक्ष म्हणजे कसा असतो याचा अनुभव नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मात्र सध्या तरी सक्षम विरोधी पक्ष बनू, असा दावा पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नेते करतायत.