काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अकोला : राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस स्वतः बुडालीच, आम्हाला घेऊन बुडाली अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
अकोल्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी ही टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना, प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस हा सेना-भाजप युती पेक्षा मोठा शत्रू ठरला असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
घोटाळे हे घोटाळे नव्हते, तो काँग्रेसचा कट होता आणि पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्यांनी आपला पक्ष बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हणलं आहे.