ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतमध्ये मनसेच्या कार्य़कर्त्यांना संबोधित केलं, यावेळी पहिल्यांदा राज ठाकरे य़ांनी ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड मुद्दे उपस्थित केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅट्रॉसिटी रद्द करून, सुधारणा करून नवा कायदा आणा हे सर्वात आधी आपण बोललो असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं, तसेच पवार त्यानंतर बोलले, मराठा मोर्चा पाहून पवारांना हे सूचलं मात्र अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय, असं शेतकऱ्यांनीच मला पहिल्यांदा सांगितल्याचं राज ठाकरे यांनी याठिकाणी स्पष्ट केलं.


तसेच आपण आर्थिक निकषावर आरक्षणाच्या बाजूने आहोत, शेतीत पैसा मिळत नसल्याने ग्रामीण तरूणांना शहरात यायचंय, जीवनमान उंचवायचंय, ही त्यांची धडपड असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.


पाहा राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे


देशासमोर मित्र बित्र कुणी नसतो- सलमानवर राज यांची टीका #RajThackeray  


इंग्रजी चॅनेल्स एकमेकांना झुंझवण्याची कामं करतात- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


मराठा बंधू-बघिणींचं अभिनंदन-देशाच्या इतिहासात असे शिस्तबद्ध मोर्चे निघाले नाहीत-राज  #RajThackeray  #MarathaMorcha


अॅट्रॉसिटीचा त्रास होतोय, हे सर्वात आधी शेतकरी माझ्याजवळ बोलले -राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


१५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचा सत्ता होती, तेव्हा यांनी आरक्षण का नाही दिलं- राज ठाकरे 


अॅट्रॉसिटीचा त्रास होतोय, हे सर्वात आधी शेतकरी माझ्याजवळ बोलले -राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


पवारांसारख्या लोकांना समाजाचं काहीही घेणं देणं नाही, यांना फक्त मतांशी घेणं देणं आहे-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे लोक बोलतात-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


आगामी जि.प. आणि पं.स. निवडणुकांसाठी मराठा मोर्चाचा गैरवापर नेत्यांकडून होऊ देऊ नका -राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


खरं तर आरक्षणालाच माझा विरोध - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


व्हीपीसिंह यांनी हे विष कालवलं-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


आरक्षण-आरक्षण, पण आहेत कुठे नोकऱ्या- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


मला जातपात कळत नाही, मी जातपात मानत नाही- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


बहुसंख्य मराठा सत्तेत होते, का नाही दिलं आरक्षण - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


मराठा मोर्चाचा गैरवापर जि.प. आणि पं.स.साठी करण्याचा विचार नेत्यांचा सुरू आहे-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


महाराष्ट्रातील उद्योगात शंभर टक्के मराठी मुला मुलींना आरक्षण द्या- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहतात, नोकरी मराठी मुला-मुलींनाच द्या- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


ग्रामीण भागातील मुलामुलींना शहरात नोकरी करण्याची इच्छा-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


शेतीत पैसा नसल्याने शहरात उद्योगांच्या शोधात ग्रामीण तरूण - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


रामदास आठवलेंचं नाव घेताच...सभेत हास्यांचे फवारे- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


रामदास आठवलेंचं नाव घेताचं सर्व हसल्यावर राज म्हणाले रामदास आठवले हे नावंच विनोद झालंय का? #RajThackeray  #MarathaMorcha


माझं काम कर नाही तर अॅट्रॉसिटी टाकीन अशी धमकी दिली जाते-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


अशा धमक्यांमुळे भांडणीच वाढतील समाजात, दुसरं काही नाही-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


शिवसेनेने आधी आरक्षणावर मत स्पष्ट करावं, अधिवेशन नंतर - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


सर्वच पक्षांना आता आरक्षणाचं राजकारण करायचंय- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


अॅट्रॉसिटीतील तरतुदी पाहिल्या तर त्याचा गैरवापराचीच शक्यता जास्त- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


अॅट्रॉसिटी रद्द करून, सुधारीत कायदा आणावा, हे सर्वात आधी मी बोललो-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


परप्रांतातील सर्वात जास्त येणारी माणसं ठाणे जिल्ह्यात येतात- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


ठाणे जिल्ह्यात ७ महानगरपालिका, देशात असा जिल्हा आहे का?-राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


कशामुळे वाढतेय या जिल्ह्यातील लोकसंख्या विचार करा - राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


परप्रांतातून येणार सर्वाधिक लोंढे ठाणे जिल्ह्यात स्थिरावतात- राज ठाकरे #RajThackeray  #MarathaMorcha


जातीबितीच्या भानगडीत पडू नका - राज ठाकरे  #RajThackeray  #MarathaMorcha