बाप्पाच्या भंडारासाठीही आता परवानगीची अट?
औरंगाबादः अन्न आणि औषध प्रशासनाने काढलेल्या नव्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आता गणेशोत्सवानिमित्त भंडारा करायचा असेल, तर त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद विभागासाठी हा निर्णय असल्याचं सांगण्यात येतंय.
गेल्या काही दिवसात अशा भंडाऱ्यांच्या कार्यक्रमातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक गणेश मंडळं भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतात.
नोंदणीकृत गणेशमंडळांना तशी नोटीसही पाठवण्यात आली आहे. सर्व मंडळांना भंडारा करण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल.