नाशिक : शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या NIIT परीक्षेत परीक्षा केंद्राचा पत्ता चुकल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय..नाशिकच्या एकलव्य शाळेत हा प्रकार घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीट परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय..हॉल तिकीटावर दुसऱ्या केंद्राचा पत्ता असल्याने हा गोंधळ उडाला..त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय..नाशिकच्या पेठ रस्त्यावरील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.


हॉल तिकीटवर मुंडेगाव परीक्षा केंद्र असं लिहलं होतं. त्यामूळे विद्यार्थ्यांना पेठ रोडवरील केंद्रावर येण्यासाठी 1 तास उशीर झाला.पाच जिल्ह्यातून विद्यार्थी येथे आल्यानं त्यांना परीक्षा केंद्र शोधणं अवघड झालं. या दोनशे विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी पालक करत आहेत..


 प्रशासनाचा हा अनागोंदी कारभार हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच घाला घालतोय की काय असंच या घटनेवरून सिद्ध होतंय.