मुंबई : वाहन उत्पादनातील आघाडीच्या कंपन्यांमधील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नाशिक आणि पुणे येथील उत्पादन प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुढील ५ वर्षांत तब्बल ८ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेक इन इंडिया सप्ताहात कंपनीकडून सोमवारी ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत कंपनीकडून राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार करण्यात आला.


नाशिक प्रकल्पात झायलो, क्वांटो यांसारख्या स्पोर्टस युटिलिटी व्हेइकलची निर्मिती केली जाते. चाकणमधील प्रकल्पात 1500 कोटींची गुंतवणूक केली जाईल. चाकण प्रकल्पात तिसऱ्यांदा गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे कंपनीची वाहन उत्पादनक्षमता चारपटीने वाढणार आहे. 


चाकणमध्ये 20 हजार गाड्यांची निर्मिती केली जाते. क्षमता वाढल्यानंतर या प्रकल्पातून किमान ऐंशी हजार मोटारींची निर्मिती करणे शक्‍य होणार आहे. महिंद्रा कंपनीच्या या गुंतवणुकीनंतर नाशिक आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.