लातूर : लातूरच्या बहुचर्चित कल्पना गिरी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्रसिंह चौहानची नार्को टेस्टची मागणी लातूर जिल्हा न्यायालयाने मान्य केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीला स्वखर्चाने नार्को टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाने दिलीय. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारच्या नार्को टेस्टची मागणी स्वतः आरोपी महेंद्रसिंह आणि गिरी कुटुंबीयांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलीय. 


काही दिवसापूर्वीच या प्रकरणाचा उलगडा व्हावा म्हणून सामाजिक संघटनांनीसुद्धा कँडल मार्च काढला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. तरीही प्रकरण जैसे थे असल्यामुळे नार्को टेस्टची मागणी पुढे आली. 


या मागणीसाठी मुख्य आरोपी महेंद्रसिंग चौहान याने लातूरच्या जिल्हा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून उपोषणही सुरु केले होते. काँग्रेसची कार्यकर्ता असलेल्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत भाजपने विशेषतः मोदी यांनी उचलल्यानंतर याची देशभर चर्चा झाली होती.