पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील १० दिवसापूर्वी पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून महिन्यात एकूण सरासरीच्या १० टक्के कमी पाऊस झाला आहे, उत्तरमहाराष्ट्रात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस उत्तर महाराष्ट्रात झाला आहे. राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा फक्त ४४ टक्के पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला आहे.


महाराष्ट्र मागील २ वर्षांपासून सलग पडलेल्या दुष्काळाने होरपळून निघाला होता. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ओसाड पडल्या होत्या. तर धरणांमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर पोहोचल्याने पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण झाली होती. अशातच महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. 


राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १ जूनपासून आत्तापर्यंत ३२७.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या काळात २९४.३ मिमीच पाऊस पडला आहे. तो सरासरीच्या ९० टक्के आहे.