राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर
विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय अशी चर्चा, कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे.
नाशिक : विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय अशी चर्चा, कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. भाजपच्या अनुसुचित जमाती मोर्चाचा विस्तार आणि पदग्रहण सोहळा, नाशिकमधल्या भाजप कार्यालयात शनिवारी पार पडला.
सोहळा निमित्तानं भाजप कार्यालयाबाहेर मोठ होर्डिंग लावण्यात आले होते. त्या होर्डिंगवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर नेत्यांचे फोटो होते. मात्र एकनाथ खडसेंच्या फोटोला त्यात स्थान नव्हतं. एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते आहेत. त्यांचं मंत्रिपद जाऊन जेमतेम आठवडाभराचा कालवधी लोटलाय. आणि एवढ्यातच पक्षानं त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.