विजय चौकात मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाही
केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला सोलापूरात पोलिसांसमोर हतबल व्हावं लागलंय
सोलापूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला सोलापूरात पोलिसांसमोर हतबल व्हावं लागलंय. सोलापूरच्या विजय चौकातील मुख्यमंत्र्यांच्या विजयी सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पोलीस आचारसंहितेच्या नावाखाली सोलापुरात मनमानी करीत असल्याचा आरोप होत आहे.
या विजय चौकात सभा झाली तर पालिकेवर भाजपची सत्ता नक्की येते असा भाजप कार्यकर्त्यांचा समज आहे.
मात्र पोलिसांनी विजय चौकात सभा घेण्यास प्रशासकीय कारण देत परवानगी नाकारली आहे. सभेच्या परवानगीसाठी पालकमंत्र्यांनीही पोलिसांकडं साकडं घातलं, मात्र पालकमंत्र्यांच्या विनंतीनंतरही पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यानं अखेर भाजपला सभेसाठी दुसरं मैदान शोधावं लागणार आहे.