रत्नागिरी : शहरवासीयांना आणखी एका नॉन बँकिंग कंपनीने गंडा घातला आहे. विजयालक्ष्मी बचत ठेव योजनेच्या नावाखाली भरमसाट व्याजदर देतो असं सांगून रत्नागिरीतल्या अनेकांना हातोहात गंडा घातला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येता तीनं पोलिस स्थानकात फिर्याद देत हा सारा प्रकार उघड केला आहे. या महिलेची १३ लाखांची फुसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रत्नागिरी या प्रकरणात आणखी काही प्रतिष्ठित लोक अडकल्याचा संशय पोलिसांना आहे.


पोलिसांनी मिलिंद सुवारे यांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील जयस्तंभ आजगावकरवाडीतला हा तरुण. या तरुणासोबत शहरातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनी रत्नागिरीकरांना गंडवले आहे. नॉन बँकिंग कंपनीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचे आमिष मिलिंद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी दाखवलं होते. 


रत्नागिरीतल्या अनेकांनी आकर्षक व्याजदर मिळतो म्हणून लाखांचा ठेवी यात गुंतवल्या होत्या. मात्र मुदत संपल्यावर मिलिंद यांनी हातवर केले. विजयालक्ष्मी योजनेच्या नावाखाली भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून २५ ते ३० जणांची १३ लाख ८४ हजाराला फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.


रत्नागिरी शहरातल्या मंजिरी कारकर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर मिलिंद सुवरेच्या मुसक्या आवळल्या गेल्या. आरोपी मिलिंद हा या साखळीतला एक घटक आहे. तो लाखो रुपये जमा करत होता. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी किती जणं गुंतले आहेत ते शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.