रत्नागिरी : शहरातील विमानतळापासून जर तुम्ही २० किलोमीटर परिसरात बांधकाम करणार असाल तर तुम्हाला तटरक्षक दलाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रत्नागिरीतल्या एमआयडीसीमधील बहुतांश बांधकामं तटरक्षक दलाच्या एनओसीमुळे थांबली आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत नवीन बांधकाम करणा-यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण जर तुम्हाला नवीन बांधकाम करायचं असेल तर भारतीय तटरक्षक दलाची परवानगी बंधनकारक असणार आहे आणि विशेष म्हणजे ही परवानगी तब्बल २० किलोमीटरपर्यंत बांधकाम कऱणा-या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. 


मात्र हीच परवानगी घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचं समोर आले आहे. रत्नागिरीत राहणारे नझीर नागलेकर फ्रेब्रुवारी २०१६ पासून ही परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत मात्र त्यांना अद्यापही तटरक्षक दलाकडून परवानगीच मिळालेली नाही.


तटरक्षक दलाकडून परवानगी हवी असेल तर प्रथम रत्नागिरीतल्या तटरक्षल दलाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा लागतो. हा अर्ज नंतर मुंबईच्या कार्यालयात जातो तिथे गेल्यानंतर तिथले अधिकारी कागदपत्रांची छाननी करतात आणि मग हा अर्ज दिल्ली येथील त्यांच्या कार्यलयात जातो. तिथे गेल्यानंतरी कागदपत्रांची छाननी होते आणि मगच परिपूर्ण प्रस्ताव मान्य करून त्या विकासकाला बांधकामाची परवानगी दिली जाते. जर साईट इलेव्हेशन सर्टिफिकेट जर नसेल तर बांधकामाला परवानगी मिळू शकत नाही.


तटरक्षक दलाच्या बाजुलाच एमआयडीसीचा भाग आहे आणि तब्बल १२०० फ्लॉटधारक या एमआयडीसीमध्ये आहेत. मात्र तटरक्षक दलाच्या फतव्यामुळे त्यांना देखील अडचणींना सामोर जावं लागत आहे. यासंदर्भात तटरक्षक दलाशी आम्ही संपर्क साधला मात्र कॉमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय तसेच हा आदेश भारत सरकारडून प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.