नागपूर : केंद्र सरकारने  500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंदीविषयी घेतलेल्या निर्णयाचे उंट व बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत करण्यात आले. नागपूर भाजपतर्फे बैलगाडीवरून साखर वाटप कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या व्हेरायटी चौकापासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात भाजप राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह आमदार अनिल सोले आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने बंदी केलेल्या हा निर्णय ऐतिहासिक असून देशाची सुरक्षा मोठी आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल, असे डॉ विकास महात्मे यांनी यावेळी म्हणालेत.


शेतकरी आणि कष्टकरी यांना काळ्यापैशामुळे नेहमीच अडचण आलेली आहे. त्यामुळे येथे बैलगाडी आणल्याचे महात्मे यांनी सांगितले. श्रीमंत आणि सामान्य माणूस आता सारखा असून याचा फायदा नक्कीच होईल, असे डॉ विकास महात्मे यांनी म्हणालेत.