अकोला : हजार,पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, अनेकांची तारांबळ उडाली आहे, मात्र तरीही सहकार्य आणि मनाचं औदार्य दाखवणाऱ्यांची कमी या देशात नाही. हाच विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होता की काय?, म्हणूनच त्यांनी एवढा मोठा निर्णय जाहीर करण्याचं धैर्य दाखवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या हॉटेलच्या दारावरून कुणीही चलन नाही, एवढ्या लहान-सहान गोष्टीने कुणी परतून जाऊ नये, शेवटी पोटभरण्यासाठीच आपण जगतोय, पैशांना कोण विचारतं, म्हणून या हॉटेल मालकाने हे मोठं मन केलं आहे.


अकोला जिल्ह्यात खामगाव या रस्त्यावर पारस औष्णिक वीज केंद्र आहे, त्या गावात जाण्यासाठी जो फाटा आहे ,तिथे एक दिलदार माणसाचं हॉटेल आहे. शेगावला जाणाऱ्या शेकडो गाड्या या मार्गी जातात, त्याची मानवता किती मोठी आहे, ते बोर्डवरुन कळेल. या माणुसकीला लोकांनी सलाम केला आहे.