नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर  देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नाशिकमधून तब्बल ३० लाख रुपये पोलिसांच्या हाती लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या क्राईम ब्रँचचं युनिट 1 शाखेने दोन वेगवेगळ्या घटनांत दोन हजारांच्या 1500 नोटा जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे खासगी क्लास चालवणा-या असद जाफर सय्यदकडून दोन हजाराच्या 850 नोटा याप्रमाणे 17 लाख रूपये वडाळा गाव परिसरातून जप्त करण्यात आल्या आहेत.


आणखी एका घटनेत युनिट 1 ने गंगापूर रोडवर सापळा रचून रोशन वालेचा, गोरफ गोफणे, सय्याजाद अब्दुल रेहमान मोटवानी या तिघांकडून दोन हजारांच्या 650 नोटा म्हणजेच 13 लाख रूपये जमा केलेत. यातले दोघे अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांच्या माध्यमातून नाशिक शहरात नोटा बदली करणारं मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


या सर्व संशयितांना नोटांचा पुरवठा कसा करण्यात आला. सुरूवातीच्या दिवसांत यांनी बँकेतून पैसे काढले की बँक कर्मचा-यांच्या साथीने पैसे काढण्य़ात आले, त्यांच्याकडून जप्त झालेल्या नोटा कोणाला देणार होते. याची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.