औरंगाबाद : ही बातमी स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची आहे.  केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कंसलटंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना, एसीबीनं रंगेहाथ अटक केली आहे. शैंलेंद्र बदामिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाच्या टॉप टेनमध्ये समाविष्ट करण्यासाठी बदामियानं पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. 


सापळा रचून बदामियाला एक लाख सत्तर हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याआधी हेच पथक पिंपरी चिंचवड, नांदेड आणि अमरावती इथं स्वच्छता पाहणी करुन आलं आहे.


शहर स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र लाचखोर अधिकाऱ्यामुळेच या मोहिमेला डाग लागला आहे