मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची एक लेन १९ दिवस बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलापासून ते खंडाळा बोगद्यादरम्यान काम सुरू.
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलापासून ते खंडाळा बोगद्यादरम्यान डोंगर कड्यावर दरड प्रतिबंध जाळ्या लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने मेकाफेरी या परदेशी कंपनीकडून हे काम केलं जातंय.
22 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत म्हणजे सुमारे 19 दिवस मुंबईकडून पुण्याकडे येणा-या मार्गावरील अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा या 300 मीटर लांबीच्या अंतरासाठी एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे..
पाहा व्हिडिओ