अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सहा वेळा धमकीपत्रे पाठवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.  नेवासे येथील ज्ञानेश मोहनीराज पानसरे, वय ४३, या लॉजमालकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली, त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंडांकडून व्यवसायास होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी, या गुंडांच्या नावाने त्याने हजारे यांना ही धमकीपत्रे पाठवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी शनिवारी ही माहिती दिली


ज्ञानेश पानसरे याचे नेवासे येथे बाजारतळावर 'समाधान' नावाचे लॉज आहे. ज्ञानेश याचा कोणत्याही संघटनेशी किंवा राजकीय पक्षाशी काही संबंध नाही. हजारे यांना आतापर्यंत किमान १३ वेळा धमक्या मिळाल्या आहेत.