नाशिक : एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती. आता, मात्र काडी मात्र दराला विकल्या जाणाऱ्या कांद्यावरच रडण्याची वेळ आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ७०० रुपये प्रती क्विंटलवर येऊन पोहचलीय. सध्या, होलसेल बाजारात कांद्याच्या किंमती १० ते १५ रुपये प्रती किलोवर येऊन पोहचल्यात. 


गेल्या आठवड्याभरापासून घसरत जाणाऱ्या कांद्याच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय.


गेल्या दोन वर्षांचा निच्चांक सध्या कांद्याच्या किंमतीनं गाठलेला दिसतोय. याआधी, एप्रिल २०१४ मध्ये कांद्याच्या किंमती ७२५ रुपये प्रती क्विंटलवर येऊन ठेपल्या होत्या.