रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात मौजे कळंबुशी-खाचरवाडी येथे शिमग्या दरम्यान पूल कोसळल्याने अनेक जण नदी पात्रात पडले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक जण जखमी झाले आहेत.


देवीचा माड घेऊन ग्रामस्थ होळी उभारण्यासाठी निघाले होते. पण पूलावर अधिक वजन झाल्यामुळे ३५ वर्ष जुना हा पूल कोसळला. या घटनेत ११ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे जुन्या पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.