पालघर : विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये आहे. शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर पालघर विधानसभेची जागा रिक्त झाली होती. 


या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून कृष्णा घोडा यांचे पूत्र अमित घोडा, काँग्रेसकडूनन माजी मंत्री राजेंद्र गावीत, तर बहुजन विकास आघाडीकडून माजी मंत्री मनिषा निमकर रिंगणात आहेत. 


निवडणुकीसाठी  ३१२ मतदान केंद्र असून मतदारांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत राजकिय चिन्हासह उमेदवारांचा फोटोही एव्हीएम मशीनवर असणार आहे. तर १६ फेबुवारीला मतमोजणी होणार आहे. 


मतदान प्रक्रियेसाठी २ हजार १०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ७१७ पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, तीन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत.