पालघर : पालघरमध्ये शनिवारी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मोजणी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेनेच्या अमित घोडा यांना 20 जवळ जवळ हजार मतांची विजयी आघाडी मिळालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री राजेंद्र गावित दुसऱ्या तर बहुजन विकास आघाडीच्या मनिषा निमकर तिसऱ्या स्थानी आहेत. सकाळी आठ  वाजल्यापासून  सेंट जॉन कॉलेज आवारात मतमोजणीला सुरुवात झाली होती. 


कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर पालघरची जागा रिकामी झाली होती.  त्यांच्या मुलाला म्हणजे अमित घोडा यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ६५.२४ टक्के मतदान झालं असून एक लाख ६१ हजार ५३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.