जळगाव : राज्यभर राबवण्यात येणाऱ्या जलसप्ताह निमित्तानं जळगावात पाणी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाणी दौडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवला. सोबतच स्वतः गिरीश महाजनही या दौडमध्ये सहभागी झाले.


काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ मैदान हे तब्बल ४ किलोमीटरचं अंतर गिरीश महाजन यांनी न थांबता पूर्ण केलं. विशेष म्हणजे या दौडमध्ये सामील झालेले जलसंपदा विभाग तसंच महसूल विभागाच्या ब-याच अधिका-यांना अवघं १०० मीटर अंतरही पार करता आलं नाही. रोजचा नियमीत व्यायाम आणि सहा ते सात किलोमीटर पळण्याची सवय यामुळेच आपण हे अंतर पार करु शकलो असा खुलासा, या कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी केला.