पालघर : पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरुन आता राजकारण रंगू लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बालमृत्यूला आदिवासी विकास मंत्र्यांसह महिला आणि बालकल्याण मंत्रीही जबाबदार असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केलाय... तसंच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खात्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
 
पालघर जिल्ह्यात रोशनी सवरा नावाच्या एका दोन वर्षांच्या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचं नुकतंच समोर आलंय. गेल्या पंधरा दिवसातला पालघर जिल्ह्यात कुपोषणानं झालेला हा तिसरा मृत्यू आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत तिघांचा कुपोषणाने मृत्यू. ईश्वर सवरा व सागर वाघ हे दोघे मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचयतीमधील. तर वाडा तालुक्यातील पेठरांजणी गावातील रोशनी सवरा या दोन वर्षांच्या चिमुकलीचा कुपोषणाने मृत्यू झाला. या भागातील कुपोषणानं होणाऱ्या मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे या भागाचा दौरा करणार आहेत.. 


यावर काय म्हणतायत पंकजा मुंडे, पाहा...


<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/Q1FsAJUMfls?rel=0" frameborder="0" allowfullscreen></iframe>