कामोठे : मतदारांना संमोहन घातलं जात आहे, मतदारांनी संमोहनातून बाहेर पडावं असं आवाहन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलकरांना केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी महापालिका निवडणुकीत पनवेलकरांनी शिवसेनेच्या हाती सत्ता द्यावी, पनवेलकरांच्या स्वप्नातलं पनवेल त्यांना देऊ असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं. 


कामोठेमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी पक्षमित्र भाजपावरही तोंडसुख घेतलं. दरम्यान पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा जोर दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांची अद्याप पनवेलमध्ये सभा झाली नाही, पण त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं शिवसैनिक म्हणतात.