खडवली : आपल्या पोटच्या दीड महिन्याच्या मुलीला खडवली रेल्वे स्थानकात सोडून पळलेल्या दाम्पत्याला रेल्वे पोलिसांनी अवघ्या १६ दिवसात आंध्रप्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्या चिमुरडीचे नाव रुचिता ठेवण्यात आले असून तिचे सध्या डोंबिवलीतील जननी आशीष चॅरीटेबल ट्रस्ट पालन-पोषण सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम विवाह त्यातच घरात अठरा विश्व दारिद्रय अशा परिस्थितीत, झालेली पहिली मुलगी. त्यामुळे तिला सांभाळणो मोठय़ा जोखमीचे झाले होते. त्यातूनच त्या दीड महिन्याच्या चिमुरडीला मध्य रेल्वेच्या खडवली रेल्वे स्थानकात सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास खडवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर शालीत गुंडाळून ठेवून दुधाची बाटलीही जवळ ठेवून निघून गेले होते. 


याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.अशाप्रकारे बाळाला सोडणा:या पालकांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावेळी पोलिसांनी खडवलीत बाळास घेवून आलेल्या दांम्पत्य कोणत्या लोकलने आले त्याचा पहिला शोध घेतला. त्यावेळी ते कसारा-सीएसटी आल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत असताना ते आटगाव रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी तेथे मोर्चा वळवला. 


त्यानुसार, त्या गावात गावक:यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतल्यावर ते बाळा किरपण यांच्या पोलट्री फार्मवर आले व ते पुन्हा निघून गेले.  त्यातच सुभद्रा हि याच गावातील असल्याचे चौकशी समोर आले.  व त्यातून तिच्या नवऱ्याची ओळख समोर आली. तसेच दोघांनी तीन वर्षापूर्वीच पळून जावून लग्न केल्यानंतर सहा महिने बाहेर राहून ते परत आटगावला आले होते. दोघेही सुभद्रा हिच्या आई-वडिलांकडे राहत होते. 


याचदरम्यान, ते कोणालाही काही न सांगता, दोघेही घरातील काही कपडे व पैसे घेवून निघून गेले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ते दोघेही छोटय़ा बाळासह आले होते. मात्र, तिच्या आई-वडिलांनी त्यांना ठेवण्यास नकार दिल्याने ते किरपण यांच्या पोलट्री फार्मवर राहत असल्याचे समोर आले. तिच्या आई व भावास विश्वासात घेवून त्यांना सीसीटिव्ही फुटेज दाखवल्यावर त्यांची ओळख पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. 


तिच्या भावाकडून गोरखचा मोबाईल नंबर मिळाला. त्या मोबाईलवर वारंवार फोन करणा:या त्याच्या मित्रचा शोध घेतल्यावर गोरख हा आंध्रप्रदेशातील नंदीगाम येथे असल्याची माहिती पुढे आली. मात्र,गोरखचा नंबर वारंवार बंद येत होते. त्यानुसार कल्याण पोलीस त्याला घेवून आंधप्रदेशमध्ये रवाना झाले. तेंव्हाही गोरखचा मोबईल नंबर येत असल्याने पोलिसांनी सांगितले. पण पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून केला आंध्रप्रदेशातील मोबाईल नंबर शोधल्यावर अॅब्युलन्स गाडीवरील चालकाचा नंबर मिळाला. 


त्याच्या चौकशीत, त्याने 3 ऑक्टोबर रोजी एक महिलेला बाळंपतणासाठी अॅडमीट करण्यासाठी गोरखने फोन केल्याचे सांगितले. त्या रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून त्या दोघांच्या घराचा पत्ता मिळून आल्यावर ही पोलिसांनी त्याच्या मित्रला गोरखला फोन करण्यास सांगितला. आणि योगायोगाने त्याने तो फोन उचलला. त्यावेळी एक बिल्डींगचे कलरिंगचे कॉट्रॅक्ट मिळाले असून मालकाने दहा हजार रुपये उचल दिली आहे व तु आणखी काही मजूरांना घेवून येत अशी बतावणी करून रिक्षा स्टॅडवर बोलवले.  


या पैशांच्या आशेने आलेल्या गोरख सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपयुक्त मध्य रेल्वे रुपाली अंबुरे यांनी दिली. ही कारवाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक माणिक साठे, सहा पोलीस निरीक्षक तडवी या पथकाने केली.