कल्याण : सध्या कल्याणमध्ये फेरीवाल्यांच्या दादागिरी आणि मुजोरीचा प्रश्न बराच गाजतोय. महापालिका अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यँत फेरीवाल्यांची माजल गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन आठवड्यांपूर्वी याच फेरीवाल्याच या मुजोरीला अखेर नागरिकांनीच चाप लावला. कल्याणपूर्वेला असणाऱ्या तिकीट घराच्या परिसरात काही फेरीवाल्यांनी ठिय्या मांडला होता.


एका नागरिकाने त्यांना  तेथून उठून बाजुला कुठे तरी बसण्याची विनंती केली..बरीच हुज्जत झाल्यानंतर जमलेली गर्दी बघता  बाकीचे फेरीवाले निघून गेले.


मात्र एका महिलेने  नागरिकाशी हुज्जत घालत अरेरावी करण्यास सुरुवात केली. कडेवर बाळ असलेल्या या महिलेची दादागिरी वाढतच चालली होती. .त्यानंतर मात्र आधीच संतापलेल्या जमावाने एकच आक्रोश करत या महिलेसह इतर फेरीवाल्यांनाही तिथून हुसकावून लावलं.


संतोष दिवाडकर या तरुणाने आपल्या मोबाइलमध्ये ही सर्व घटना कैद केली..सध्या गाजत असलेल्या फेरीवाला मारहाण प्रकरणानंतर झी मीडियाला ही उपलब्ध झाली.