पिंपळगाव टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची दमदाटी, पारदर्शक कारभाराची बोंब
नाशिक सोडल्यानंतर पिंपळगाव टोल नाका लागतो. मात्र, येथील कर्मचारी दमदाटी आणि दादागिरी करत असल्याचे दिसून आलेय.
मुंबई : नाशिक सोडल्यानंतर पिंपळगाव टोल नाका लागतो. मात्र, येथील कर्मचारी दमदाटी आणि दादागिरी करत असल्याचे दिसून आलेय. नोटबंदीनंतर कॅशलेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचे संकेत केंद्रातील मोदी सरकारने दिलेत. मात्र, या ठिकाणी ट्रान्जॅक्शनचा नियम पाळण्यात येत नसल्याचे पुढे आलेय. येथील टोल नाक्याचा कारभार पारदर्शक आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
'झी 24तास ऑनलाईन'चे संपादक प्रशांत जाधव आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी चाळीसगावला निघाले होते. त्यांनी 'स्वाईप मशीन'ची मागणी केली. मात्र, यावेळी टोल नाक्यावरील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केली. आम्ही या देशात राहत नाही. तुम्ही पैसे द्या, अशी मागणी करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जी बातमी द्यायची असेल तर तुम्ही पहिल्या पानावर द्या. काय करायचे ते करा पण पैसे द्या, असे सांगत दमदाटी करत दादागिरी केली.
मात्र, प्रशांत जाधव यांची गाडी टोल नाक्यावर रोखून धरत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केली. यावेळी जाधव यांनी गाडीतून खाली उतरत फेसबूक लाईव्ह करत या प्रकरणाला वाचा फोडली. फेसबूक लाईव्ह पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी पाठ फिरवून थोडे मागे हटले. शेवटी तेथील महिला कर्मचाऱ्यांने धावपळ करत 'स्वाईप मशीन' आणले आणि टोल घेतला. मात्र, टोलची पावती दिली नाही. गाडी टोल नाक्यावर थांबवून ठेवल्यानंतर टोलची पावती दिली गेली.
याबाबत ऑनलाईनचे संपादक प्रशांत जाधव यांनी सांगितले, पिंपळगाव टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांवर मागणी करुनही 'स्वाईप मशीन नाही, कॅश द्या अशी दमदाटी करतात. कॅशलेस ट्रान्जॅक्शनचा नियम पिंपळगाव टोलनाक्याला लागू होत नाही का?
टोल नाक्यावर पारदर्शक कारभार होतोय का? पिंपळगाव टोलनाक्यावर मागणी करुनही 'स्वाईप मशीन नाही कॅश द्या अशी दमदाटी' करतात. कॅशलेस ट्रान्जॅक्शनचा नियम पिंपळगाव टोलनाक्याला लागत नाही का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जवळपास 20 मिनिटानंतर मशीन नाही सांगणाऱ्यांनी तेथे स्वाईप मशीन उपलब्ध करुन दिली. मात्र पावती देण्यास आधी टाळाटाळ केली. कालांतराने टोल पावती दिली. हे कशासाठी केले जाते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.