पिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सचा निष्काळजीपणा
पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या या आहेत शिल्पा परिहार. एक एप्रिलला त्या प्रसूतीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्या. दोन तारखेला शस्त्रक्रीया करत त्यांची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर त्यांना थंडी वाजू लागल्याने त्यांच्या पायावर वार्मिंग मशीन लावण्यात आलं. पण ते लावल्यानंतर मशिन लावल्याचं नर्स विसरली.
पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या या आहेत शिल्पा परिहार. एक एप्रिलला त्या प्रसूतीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाल्या. दोन तारखेला शस्त्रक्रीया करत त्यांची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर त्यांना थंडी वाजू लागल्याने त्यांच्या पायावर वार्मिंग मशीन लावण्यात आलं. पण ते लावल्यानंतर मशिन लावल्याचं नर्स विसरली.
पायात वेदना होऊ लागल्यामुळे शिल्पा परिहार यांनी मदतीसाठी विचारणा केली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अति उष्णतेमुळे परिहार यांचा पाय चांगलाच भाजला. संबंधित नर्सवर कारवाई करण्याची मागणी केली पण त्यावर काही ही कारवाई झालेली नाही.
दुसरीकडे या प्रकरणी आदित्य बिर्ला प्रशासनाकडून कोणीही बोलायला तयार नाही. यापूर्वी ही आदित्य बिर्ला रूग्णालयासंबंधी अनेक तक्रारी आल्या आहेत. पण इथे सरळ सरळ निष्काळजी झालेली दिसत असताना बिर्ला हॉस्पिटल चूक ही मान्य करायला तयार नाही आणि कारवाई करायलाही तयार नाही. रुग्णांच्या जीवाशी ही रुग्णालय कशी खेळतात त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणाव लागेल.