कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची तर उपमहापौर पदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौरांच्या खुर्चीवर बसत काळजे यांनी दोन विक्रम घडवले. एकतर ते भाजपचे पहिले आणि पहिलेच अविवाहित महापौर असे दोनही ठरलेत. पालक मंत्री गिरीष बापट आणि माजी पालक मंत्री अजित पवार यांच्यात शेवटच्या क्षणी चर्चा घडली आणि राष्ट्रवादीने महापौर-उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे काळजे आणि मोरे यांचा मार्ग सुकर झाला. 


काळजे यांना पक्षातील जगताप-लांडगे आणि निष्ठावान यांच्यात सुरु असलेल्या गटबाजीची सांगड बांधून शहराचा विकास करण्याचं आवाहन असणार आहे.