पिंपरी चिंचवड : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. महापौरपदी आपला नगरसेवक बसवत आमदार महेश लांडगे यांनी बाजी मारलीय. तर स्थायी समितीत १० पैकी ९ सदस्य आपल्याच गटाचे निवडत शहराध्यक्ष जगताप यांनी दुसरा सामना जिंकलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आली असली तरी आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात तीव्र सत्ता संघर्ष सुरु झालाय. महापौरपदी आपल्या गटाच्या नितीन काळजे यांची निवड करत महेश लांडगे यांनी पहिला सामना जिंकलाही. 


पण स्थायी समितीमध्ये भाजपच्या १० जणांची निवड झालीय. त्यात कुंदन गायकवाड वगळता ९ जण जगताप गटाचेच आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या जगताप गटाकडे राहणार हे नक्की. 


जगताप गटाकडून सीमा सावळे आणि आशा शेंडगे या दोन मैत्रिणींसोबतच हर्षल ढोरे यांचंही नाव, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण अध्यक्ष कोणीही झालं तरी स्थायी समितीवर जगताप यांचाच वरचष्मा असणार आहे.