पिंपरी-चिंचवड : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या शगुन चौक येथील अडड्यावर पिंपरी पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली.


राम गोविंद बजाज, अनिल दिपकलाल दर्डा आणि गोविंद प्रभुदास ललवानी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएलमध्ये सुरु असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईज हैदराबाद या सामन्यावर पिंपरी येथील शगुन चौकात बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शगुन चौकातील कॉटन किंग दुकानाच्या वरती तिसर्‍या मजल्यावर सुरु असलेल्या बेटींगच्या ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतलं. प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहे.