नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी नकार देणाऱ्या पोलिसांना अटक
नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी दोन पोलिसांनाच अटक केलीय.
नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी दोन पोलिसांनाच अटक केलीय.
नक्षलग्रस्त भागात निवडणूक बंदोबस्तसाठी जाण्यास नकार दिल्यानं ही कारवाई करण्यात आलीय. आपलं वय 50 हून अधिक असल्यानं आपल्याला अशा ठिकाणी तैनात करण्यात येऊ नये, अशी मागणी या दोन पोलिसांनी केली होती.
अटक झालेल्यांमध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षक स्तरावरच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या दोघांवर कारवाई करत एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलीय.