पोलिसांच्या मारहाणीविरोधात आमरण उपोषण
दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
यवतमाळ : पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांविरोधात यवतमाळमधल्या आर्णी इथल्या साबीर खान मीर खान, या मजुराने 27 डिसेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केलं आहे.
दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
तसेच मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक राजकिरण मडावी आणि वाहतूक शिपाई शिवानंद हेबांडेंवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांची वार्षिक वेतनवाढ दोन वर्षांसाठी रोखण्याची कारवाई केल्याची लेखी माहिती दिली.
तसेच आर्णीचे ठाणेदार खंदाडे यांनाही तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची नोटीस जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी बजावली आहे.