चोरी गेलेल्या ४ किलो सोन्याची लीना मोतेवार हिच्याकडून लपवाछपवी
पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेल्या समृद्ध जीवनचा संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवार हिचं बिंग फुटले आहे.
पुणे : पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेल्या समृद्ध जीवनचा संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवार हिचं बिंग फुटले आहे. लीना मोतेवार हिने २९ जानेवारी २०१६ ला चोरीला गेलेल्या चार किलो सोन्याच्या दागिन्यांची माहिती लपवली आणि हीच बाब तिच्या अंगलट आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत राहणारा चालक नरहरी घरतच्या घरी लीना हिने आठ किलो सोन ठेवलं होते. दोन स्वतंत्र डब्ब्यात ठेवण्यात आलेल्या दागिन्यांपैकी एक डब्बा २९ जानेवारीला चोरीला गेला होता. चालकाला मारहाण करुन आरोपींनी ही चोरी केली. सुरुवातीला चालकावर लीना हिनं संशय व्यक्त केला. परंतु त्यानं सत्य परिस्थिती सांगताच ती चक्रावून गेली.
तिने याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्याऐवजी चालकाला चक्क करमळ्याला पाठवले. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट चारने दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या आरोपींनी चालकाच्या घरातून सोने चोरल्याची कबुली देत, लीना मोतेवारचं बिंग फोडले. आता किलो सोनं पोलिसांना मिळाल्यावर मोतेवारांच्या पत्नीचीच लपवाछपवी उघड झाली आहे.