उस्मानाबाद : पोलीस भरतीत शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या अपघांवर मात करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये मोठा फेरबदल केला. मात्र या बदलेल्या नियमांचा फायदा होण्या ऐवजी उमेदवारांना त्याचा फटका बसण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धावण्याच्या चाचणीमधील अंतर कमी करणारे पोलीस प्रशासनाचे नवे परिपत्रक म्हणजे रोगापेक्षा उपचार भयंकर असं म्हणण्याची वेळ आली आहे. पोलीस शिपाई भरतीदरम्यान उमेदवारांमध्ये खरा कस लागतो तो धावण्याच्या चाचणीत. यापूर्वी अनेक उमेदवारांना या चाचणीदरम्यान दुखापत झालीये तर काहींचा मृत्यूही झालाय. त्यामुळे यावर मात करण्यासाठी गृहविभागानं धावण्याचं अंतर कमी करणारं नवं परिपत्रक काढलं.



ज्यात पुरुषांसाठी ५ किमी ऐवजी १६०० मीटर आणि महिलांसाठी ५ किमी ऐवजी ८०० मीटर अंतर ठेवण्यात आलं. मात्र हे नवे नियमच उमेदवारांसाठी अडचणीचे ठरु लागलेत. याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


१६०० मीटर अंतर ४ मिनिट ५० सेकंदात पार पाडणं अशक्य आहे. आर्मी मध्ये या साठी ५ मिनिट ४० सेकंदाचा वेळ दिला जातो. आर्मी प्रमाणे वेळ ठेवावा, अशी मागणी उमेदवारी महावीर वाघमारे याने केलेय.


तर या पूर्वी ३ किमी ला २० मिनिटे वेळ होता आता ८०० मीटर साठी २ मिनिट ४० सेकंद दिले आहेत. हे खूप हार्ड जात आहे, अशी प्रतिक्रिया माया राठोड हिने दिलेय.


या पूर्वी पोलीस भरती दरम्यान उमेदवारांना झालेले अपघात आणि मृत्यू लक्षात घेता सरकारने धवण्याचं अंतर कमी केलं हे मानवीय दृष्टीकणातून योग्यच आहे. मात्र कमी केलेल्या अंतरासोबत वेळेच्या मर्यादेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.