वर्धा : रेशन दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याच्या दृष्टीने व पारदर्शी कारभार व्हावा या साठी वर्धा जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना POS मशीन वितरित केल्या आहेत. या मशीन च्या माध्यमातून राशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना ते वाटले व किती रुपयात वाटले याची अचूक माहिती मिळणार आहे.


GPS प्रणालीसोबत संलग्न असलेल्या या मशीन मुळे रेशन दुकानदार आता ग्राहकांची फसवणूक करू शकणार नाही व या धान्य वाटपात पारदर्शकता येईल असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ग्राहक जेव्हा धान्य घेण्यासाठी रेशन दुकानात जाईल तेव्हा त्याला आपला रेशन कार्ड क्रमांक व पासवर्ड या मशीन मध्ये टाकून आपल्या अंगठ्याचा ठसा मशीनवर द्यावा लागणार आहे.