औरंगाबाद : कुंभारवाडा... औरंगाबादची एक सगळ्यात जुनी बाजारपेठ... शॉपिंग करायची म्हटलं की, औरंगाबादकरांचे पाय कुंभारवाड्याकडेच वळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र 8 नोव्हेंबरला नोटबंदी झाली आणि हे मार्केट देखील ओस पडलं... अगदी औषधाला देखील इथं व्यवहार होत नव्हते.


मात्र नोटबंदीत न खचता इथल्या व्यापा-यांनी ऑनलाईनची वाट धरली... पेटीएमसारख्या ऑनलाईन वॉलेटची मदत घेत दीडशेहून अधिक व्यापाऱ्यांची दुकानं कॅशलेस झाली. 


आता या बाजारात तुम्हाला साधं बिस्कीट जरी खरेदी करायचं असेल किंवा चॉकलेट घ्यायचं असेल तर तेही कॅशलेस घेता येतं.


चटण्या, लोणच्यांची दुकानंही कॅशलेस झाली आहेत. काहींनी इलेक्ट्रॉनिक वॉलेटची मदत घेतली तर काही व्यापा-यांनी स्वाईप मशीन बसवून घेतल्यानं चिंता मिटली.


सगळ्या दुकांनांसोबत या बाजारपेठेतील चहाचा गाडा सुद्धा कॅशलेस झाला आहे.


या बाजारपेठेतील 90 टक्यांपेक्षा जास्त दुकानं कॅशलेस झाली आहेत आणि राहिलेली दुकानं सुद्धा काही दिवसांत कॅशलेस होतील असा विश्वास व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व्यक्त करतायत. 


पैशांच्या तुटवड्यामुळं लोकांचे हाल होताहेत हे जरी सत्य असलं तरी काही लोकांनी या संकटाचंही संधीत रुपांतर केलं आहे. 


कॅशलेस व्यवहार करत असल्यानं विक्रीतही वाढ झाल्याचं कुभारवाड्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळं आता इतर व्यापा-यांनीही याचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही.