राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
मुंबई: पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पेट्रोल साडेतीन रुपयांनी तर डिझेल 2 रुपये 42 पैशांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल-डिझेल असोसिएशननं ही माहिती दिली आहे.
2002 साली केंद्र सरकारनं महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर अधिभार आकारायला परवानगी दिली होती. पण 2014 मध्ये पेट्रोलचे दर नियंत्रण मुक्त झाले, आणि दर ठरवण्याचा अधिकार इंधन कंपन्यांना देण्यात आला. त्यामुळे 2014 मध्येच हा अधिभार काढणं गरजेचं होतं. तरीही तो सुरुच होता.
पण आता राज्य सरकारनं हा अधिभार काढण्याचा निर्णय घेतल्यानं सामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.