अहमदनगर : कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. लातूरमध्ये सर्वपक्षीय संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बंदला हिंसक वळणही लागलं. लातूर तालुक्यातल्या भोई समुद्रगा इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिली. ज्यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुकमोर्चा तहसील कार्यालय पर्यंत नेण्यात आला. दरम्यान राहुरीतील नगर मनमाड रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 


कोपर्डीच्या घटनेची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी निधेष केलाय. समाजात महिला आणि मुलींची सुरक्षितता हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. यासाठी सरकार, पोलीस यंत्रणा आणि समाजाने अधिक दक्ष रहायला हवे. जेणे करून अशा घटना घडणार नाहीत. तसेच अशा घटना घडल्यानंतर त्यावर वादविवाद न करता त्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पहायला हवे आणि पीडित कुटुंबाला सामाजिक आधार द्यायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे.