पुणे : पुण्याच्या बाणेरमध्ये झालेल्या भरधाव कार अपघात प्रकरणातील आरोपी सुजाता श्रॉफला जामीन मंजूर झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी बाणेरमध्ये झालेल्या या अपघातात एका चिमुकलीचा व तिच्या आईचा मृत्यू झालाय. याप्रकरणी सुजाताला अटक करण्यात आली होती. मात्र २४ तासांच्या आत त्यांची सुटका झालीये. सुजाता श्रॉफ ही बांधकाम व्यवसायिकाची पत्नी आहे. 


बाणेरमध्ये डिव्हाईडवर उभ्या असलेल्या चौघांना सुजाताच्या कारने उडवले होते. या अपघातात चिमुकलीचा काल मृत्यू झाला होता. तर तिच्या आईचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.