पुणे : महापालिका महापौर पदाची निवडणूक 15 मार्चला होत असून मुक्ता टिळक यांच महापौर होणार हीच औपचारिकता आहे. मात्र, प्रथमच आरपीआयला उपमहापौर पदाची लॉटरी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौरपदासाठी पुण्यात भाजपच्या मुक्ता टिळक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपमहापौरपदासाठी आरपीआय आठवले गटाचे नवनाथ कांबळे यांनी तर काँग्रेसकडून लता राजगुरू यांनी उमेदवारी दाखल केली. 


या दोन्ही पदांसाठी 15 मार्चला निवडणूक होणार आहे. पुणे महापालिकेत भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे.